मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे आज पदग्रहण सोहळा

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : येथील मराठा मंगल कार्यालय येथे रविवार, दिनांक २८ जून रोजी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ॲड. कौस्तुभ पाटील यांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब संदीप पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत पवार, अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम) चे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) चे अध्यक्ष धनंजय चौधरी उपस्थित राहणार आहेत. या पदग्रहण सोहळा कार्यक्रमात शुभेच्छा व आशिर्वाद देण्याकरिता उपस्थित राहावे अशी विनंती अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ सुनिल पाटील यांनी केली आहे.
