मारवड जि.प.शाळेत सेल्फी पॉईंट व पहिले पाऊल उपक्रमाने विद्यार्थ्यांचे स्वागत

मान्यवरांच्या शुभहस्ते नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत तसेच पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : जि.प.शाळा मारवड येथे निपुण भारत अंतर्गत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासन निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव व शाळा पुर्वतयारी मेळावा क्र.२ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मेळावा भेटीसाठी आलेले पं.स.अमळनेर चे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, मारवड हायस्कूलचे माजी प्राचार्य एल.जी.चौधरी यांचेसह दोन्ही शाळांचे शा.व्य.समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील, चंद्रशेखर साळुंखे, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य किशोर पाटील, सदगुरु कोळी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तक व गणवेश यांचेही वाटप करण्यात आले. मेळाव्यातील सेल्फी पॉईंट व पहिले पाऊल स्टॉलचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मारवड गावचे सरपंच भिकनराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मेळावा भेटीसाठी आलेले पं.स.अमळनेर चे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, मारवड हायस्कूलचे माजी प्राचार्य एल.जी.चौधरी यांचेसह दोन्ही शाळांचे शा.व्य.समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील, चंद्रशेखर साळुंखे, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य किशोर पाटील, सदगुरु कोळी यांचेसह कन्याशाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, बॉईज शाळेचे मुख्याध्यापक महेश बोरसे उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी पटसंख्या तसेच उपस्थिती वाढीसह निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गुणवत्ता वाढ व शिष्यवृत्ती सारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी बाबत उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन केले. तसेच गेल्या वर्षी भारत टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकासह गुणवत्ता यादीत निवड झालेल्या शाळेतील इ.१ ली ची कु. तमन्ना अनिल पाटील या विद्यार्थीनीचा बक्षीस देऊन सत्कार केला. माजी प्राचार्य एल.जी.चौधरी यांनी कन्याशाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक व उपशिक्षक एकमेकांशी सुसंवाद साधत गुणवत्ता वाढीसह स्पर्धा परीक्षा, बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेह संमेलन यासारख्या कार्यक्रमातून शाळा अग्रेसर होत असल्याबाबत गौरवोद्गार काढले. मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सेल्फी पॉईंट व पहिले पाऊल यामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व कुतुहलाचे वातावरण दिसून आले. मेळाव्या मध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी सात प्रकारच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. यात प्रत्येक दाखलपात्र विद्यार्थ्यांकडून विविध कृती करून घेण्यात आल्या. तशी नोंद त्यांच्या कृतीपत्रात घेण्यात आली. शालेय पोषण आहारात मिष्ठान्न भोजन देऊन नवागतांसह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा शुभारंभ दिवस खास ठरला.

याप्रसंगी उपशिक्षक गिरीष पाटील, सविता पाटील, चेतना वानखेडे, सुधीर पाटील, विशेष शिक्षक हंसराज पाटील, अंगणवाडी सेविका उषा साळुंखे, हेमलता साळुंखे, उर्मिला साळुंखे, वैशाली चौधरी, प्रमिला महाले, मदतनीस पुष्पाबाई पाटील, दिपाली साळुंखे, नयना पाटील, शिला पाटील, जयश्री साळुंखे, पालक नरेंद्र पाटील, प्रशांत बडगुजर, दिपाली पाटील, सरला कुंभार, जागृती कोळी, ज्योती वडर, शापोआ स्वयंपाकी उषाबाई कोळी, मंगला साळुंखे, मदतनीस अशोक कोळी, ग्रामस्थ, पालक व शाळेतील आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुधीर पाटील व आभार प्रदर्शन दत्तात्रय सोनवणे यांनी केले. संपुर्ण मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मेळाव्यासाठी नियुक्त्त केलेले स्वयंसेवक माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!