अमळनेर PTA संघटनेतर्फे घोषणा देत तीव्र निषेध

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी घात करणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेर PTA तसेच शैक्षणिक संस्था प्रमुख यांच्या वतीने सोमवार, दि. १८ मे रोजी प्रांत कार्यालय परिसरात शांततामय पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर PTA चे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व संदीप घोरपडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी व भविष्याशी होणारी तडजोड असह्य असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी
केली.
PTA तर्फे सौ. सुरश्री वैद्य मॅडम तसेच सुधीर टाकणे सर यांनी मनोगत व्यक्त केले. NEET अन्यायग्रस्त विद्यार्थी लावण्या सातपुते व अजिंक्य पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अन्याय अधोरेखित केला. यावेळी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही”, “पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणा देत शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सदर आंदोलनात सर्वश्री किरण माळी, राकेश बडगुजर सर, सौ. सुरश्री वैद्य मॅडम, ज्ञानेश्वर मराठे, नागराज माळी, हर्षल बडगुजर, स्वर्णदीप राजपूत, संदीप महाजन, सुधीर टाकणे, ज्ञानेश्वर साळुंखे, अविनाश कोळी, सुनील पाटील आदी PTA क्लास संचालक उपस्थित होते.
