अ. भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विलासराव पाटील यांची पुन्हा निवड

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये झाला यथोचित सत्कार

अमळनेर : देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांची नुकतीच पुन्हा अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. यानिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले विलासराव पाटील हे विविध पदावर कार्यरत आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे, निंबा गजमल देशमुख, मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी, अरविंद सोनटक्के, शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरुदास पाटील आदी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करतांना विलासराव पाटील म्हणाले की, अखिल भारतीय माळी महासंघाने चांगल्या कामाची पावती म्हणून पुन्हा माझ्या नावाला पसंती दर्शवली आहे. महासंघाचे नेतृत्वात, महासंघाने संघटन वाढीवर भर देण्यासाठी कटिबद्ध राहू व माळी महासंघाच्या प्रत्येक कार्यामध्ये सर्वतोपरी योगदान देऊ असे आश्वासित केले. अखिल भारतीय माळी महासंघ विविध राज्यांमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेले एक सशक्त संघटन आहे. श्री पाटील यांनी आपल्या कार्य गुणाने आणि उत्कृष्ट नेतृत्वाने अनेक युवकांना एकत्र आणले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, अखिल भारतीय माळी महासंघाची वाटचाल अधिक मजबूत होईल. अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांनी शाल व बुके देऊन विलासराव पाटील यांचा सत्कार केला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!