अमळनेरच्या छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आजपासून सावित्रीबाईंच्या लेकींचा भव्य महिला महोत्सव सुरु

महिला महोत्सवाचे सातवे वर्ष असून विविध स्पर्धांसह रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल: कार्यक्रमाच्या दरम्यानच बक्षीस वितरण

अमळनेर : महिला व बाल कल्याण विभाग, अमळनेर नगरपरिषद आणि अमळनेर महिला मंच ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गौरीसुत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आयोजित सावित्रीबाईंच्या लेकींचा भव्य महिला महोत्सवाचे आयोजन दिनांक ३ ते ६ जानेवारी दरम्यान येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे. महिला महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिलांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने व त्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवार, दिनांक ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता महिला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार स्मिता उदय वाघ असून उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व डिगंबर महाले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

रंगारंग कार्यक्रमाची रुपरेषा…

आज शुक्रवार, दिनांक ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता स्टॉल उद्घाटन, महिला महोत्सव उद्घाटन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि महिला ऑर्केस्ट्रा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या डायरेक्टर संगीता पाटील यांची उपस्थिती राहील. शनिवार, दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता नृत्य स्पर्धा होईल. यावेळी सीमा पाटील (उद्योजिका, नासिक) यांची उपस्थिती राहील. रविवार, दिनांक ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता लोककला स्पर्धा होतील. यावेळी मान्यवरांचे मनोगत व स्वागत होणार असून पत्रकार संध्या नरे पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील. सोमवार, दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आनंद मेळावा व स्टॉल चा आनंद घेता येईल.

सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या दरम्यानच होणार आहे. तसेच वरील सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होतील. चारही दिवस स्टॉल (आनंद मेळावा) चालू राहतील. तसेच गेम्सचेही स्टॉल चालू राहतील. तरी सर्व नागरीकांनी स्टॉल्स, गेम्स व आनंद मेळाव्याचा आनंद घ्यावा असे आवाहन महिला मंच ट्रस्ट अध्यक्षा डॉ. अपर्णा मुठे, सचिव सरोज भांडारकर, उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वेवोतोल्लु केजो, खजिनदार कांचन शहा तसेच कार्यकारिणी सदस्या भारती गाला, पद्मजा पाटील, वसुंधरा लांडगे, विजया देसर्डा, उज्वला शिरोडे, करुणा सोनार, रंजना देशमुख, प्रा. शीला पाटील, विद्या हजारे, माधुरी पाटील यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!