किसान विद्यालय, जानवे येथे जाऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले वाचनाचे महत्त्व

अमळनेर : तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय येथे थोर समाज सेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वाचन पंधरवडा या उपक्रमाचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण लोकनियुक्त सरपंच सौ. सरलाताई प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य प्रकाश पाटील (वकील बाबा), नवल पाटील गुढेकर, प्रकाश भाऊ वाल्हे, पितांबर आप्पा, देविदास लोटन पाटील, भटू सोनू पाटील, जंगलू पारधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डी.एम पाटील यांनी सावित्री बाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच किसान विद्यालय, जानवे येथे जाऊन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी वाचनालयात येऊन पुस्तके वाचावीत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले.
