पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, मंगळ ग्रह संस्थेचे सेवेकरी व कुटुंबीयांनी घेतला लाभ

अमळनेर : पत्रकार म्हणून कार्य करीत असताना भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर घेऊन मोठे सामाजिक कार्य व्हॉईस ऑफ मीडिया व मंगळ ग्रह सेवा संस्था संयुक्तपणे करीत आहात ही अभिमानाची गोष्ट असल्याची भावना अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी परिविक्षाधीन मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (आयएएस) यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली. अमळनेर येथील वाणी मंगल कार्यालयात व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे ६ जानेवारीला आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (आयएएस), जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. सोबत मंचावर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, न. प. चे अभियंता डिगंबर वाघ, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा संघटक जयेश काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष अजय भामरे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व मंगळग्रह देव प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा डॉ. दिगंबर महाले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी प्रास्ताविक केले. किरण चव्हाण व अजय भामरे यांनी महाराष्ट्र गीत गायले. ज्येष्ठ पत्रकार सुभाष घोडगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, मंगळ ग्रह मंदिराचे सेवेकरी व त्यांचे कुटुंबीयांसाठी मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते नारळ वाढवून आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरासाठी गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचे सहकार्य लाभले. शिबिरात डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. प्रजोत कदम, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उमेश अब्दुलवाड आणि डॉ. वेदांत पाटील यांच्यासह टीमने शेकडो गरजूंच्या २डी इको, इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तसेच इतर तपासण्या केल्या. पैकी, काही रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी बुधवार, दिनांक ८ रोजी गोदावरी मेडिकल फाउंडेशन येथे पाठविण्यात येणार आहे.

दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक विकास देवरे, ॲड. ललिता पाटील, हरी भिका वाणी, पाडळसे धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, खा. शि. मंडळाचे निरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, शिरीषदादा मित्र परिवाराचे प्रविण पाठक, सुनिल भामरे तसेच विविध राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पत्रकार बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे यांनी तर व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, आर. टी. पाटील, आनंद महाले, भरत पाटील, पुषंद ढाके, मनोहर तायडे, बाळा पवार, भूषण पाटील यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष गौतम बिऱ्हाडे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव ईश्वर महाजन, प्रसिध्दी प्रमुख दिनेश पालवे, जयंत वानखेडे, विवेक पाटील, उमेश धनराळे, धनंजय सोनार, बापूराव ठाकरे, राहुल पाटील, रजनीकांत पाटील, रवींद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, भाऊसाहेब देशमुख, शरद कुलकर्णी, किरण चव्हाण, दयाराम पाटील, प्रकाश जैन, बी. एल. पाटील, प्रसाद जोशी, किशोर सोनजे, संजय पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत निकुंभ, भूषण महाले, पंकज पाटील आदींनी सहकार्य केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.