
अमळनेर : लायन्स क्लब आयोजित सेवार्पण – समर्पण सोबत गोवा या ब्रीदवाक्याखाली डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. गोवा येथील रिओ रिसॉर्ट येथे लायन्स क्लब ची बैठक संपन्न झाली. यावेळी अमळनेर येथील लायन्स चे रिजन चेअरमन योगेश मुंदडा यांना तीन विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यावेळी योगेश मुंदडा यांना सर्वोत्कृष्ट रिजन चेअरमन सुवर्णपदक सोबतच आंतरराष्ट्रीय प्रेसिडेंशियल पदक व सेवार्थी हे पुरस्कार पीआयडी डॉ. नवाल मालू, एमसीसी ला. सुनील देसर्डा, डीजी गिरीश सिसोदिया, एफव्हीडिजी ला. अश्विन बजोरिया आणि पहिल्या महिला ला. संगीता सिसोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी अमळनेर लायन्स प्रेसिडेंट अजय हिंदुजा, ला. विनोद अग्रवाल, ला. दिलीप गांधी, ला. बाळू कोठारी, ला. दिनेश मणियार, ला. लालू सोनी आदी उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !
