मिणमिणत्या प्रकाशात सर्वधर्मीयांतर्फे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिवंगत झालेल्या निष्पाप नागरिकांना वाहिली श्रद्धांजली; आतंकवादाचा केला निषेध

अमळनेर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी व आतंकवादाचा निषेध करण्यासाठी काल दिनांक २८ रोजी अमळनेर शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी कॅण्डल मार्चचे आयोजन केले होते. कॅण्डल मार्चसाठी सर्व धर्मीय अमळनेरकर नागरिक बंधू-भगिनी यांनी सहभाग नोंदविला. अल्लामा फजले हक खैराबादी (रहे) स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी यांचा सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला सुरुवात होऊन साने गुरुजी पुतळ्यापर्यंत रॅली आणण्यात येऊन तेथे समारोप करण्यात आला. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘आतंकवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. सर्वांनी मेणबत्त्या पेटवून मिणमिणत्या प्रकाशात दिवंगत झालेल्या निष्पाप नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून शांतीसाठी प्रार्थना केली. उपस्थितांनी दहशतवादाचा निषेध केला. सर्ववधर्मीयांनी एकात्मता व शांततेचा संदेश दिला.

दहशतवाद हा मानवतेसाठी घातक असून सर्वांनी एकत्र येऊन शांतता आणि सौदार्ह टिकवले पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी सुभाष अण्णा चौधरी, मनोहर नाना, प्रा. अशोक पवार, डिगंबर महाले, संदीप घोरपडे, तिलोतमा पाटील, सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत, मनोज पाटील, बी. के. सूर्यवंशी, ॲड. शकील काझी, प्रा. विनय जोशी, प्रा. शीला पाटील, ॲड. तिलोतमा पाटील, वसुंधरा लांडगे, रणजित शिंदे, प्रा. लिलाधर पाटील, रियाज मौलाना, अखलाक भाई, जहुर मुतवल्ली, फय्याज भाई, दबीर पठान, मोहम्मद भाई बोहरी, हाजी सूपडु, गयास अहलकार, रुकनोद्दीन अहलेकार, अहमद अली, शराफ़त अली, अ.खालीक अहलेकार, अहतेशाम भाई, शकील सर यांचेसह हिंदू मुस्लिम बांधव, बोहरी समाज एकवटला होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!