नवनिर्वाचित पदाधिकारी यांना दिले नियुक्ती पत्र; तालुकाध्यक्ष पदी डी. एम. पाटील तर शहराध्यक्ष पदी प्रशांत निकम

अमळनेर : येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शनिवार, दिनांक १४ जून रोजी स्टेशन रोडवरील शिव पेट्रोलियम येथे संपन्न झालेल्या या बैठकीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बंधू-भगिनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केले.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पक्ष वाढी संदर्भात डॉ. बी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब प्रमोद पाटील यांनी निवड केलेल्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांचेसह नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. बैठकीस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर नाना निकम, कमल आक्का, अनंत निकम, ॲड. शकील काझी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू -भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत निकम यांनी केले.