खतांच्या कृत्रिम तुटवड्यामुळे अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने ‘हल्ला बोल’ आंदोलन

अमळनेर : अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा झाल्यामुळे नुकतेच ‘हल्ला बोल’ आंदोलन करण्यात आले. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. सुभाष जिभाऊ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शिवसेनेचे विजू मास्तर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा, प्रा. अशोक पवार, मनोहर नाना निकम, भागवत गुरुजी यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाप्रती भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला कॉग्रेसचे जेष्ठ नेते धनगर आण्णा, प्रताप आबा, मुन्ना शर्मा, डॉ. रविन्द्र पाटील, बोरसे आबा, कैलास आप्पा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत निकम, जाकीर शेख, मनोहर पाटील, वासुदेव मामा, महिला अध्यक्ष योजना पाटील, सेनेचे शहराध्यक्ष चंद्रशेखर भावसार व अमळनेर तालुका महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. शेवटी उपविभागीय कृषी अधिकारी साठे साहेब, तालुका कृषी अधिकारी ठाकरे साहेब, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ठाकूर साहेब यांनी जागेवर येऊन निवेदन स्विकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप घोरपडे यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!