विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला सन्मानित

अमळनेर : येथील सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघ यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथील सभागृहात बुधवार, दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मसाप चे अध्यक्ष संदीप घोरपडे होते. विचार मंचावर ज्येष्ठ नेते डॉ. बी. एस. पाटील, जिजामाता पुरस्कार विजेत्या राजश्री पाटील, मौर्य क्रांती सेना चे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, प्रा. अशोक पवार, समाधान धनगर, डी. एम. पाटील, एस. सी. तेले, नितीन निळे, गोपीचंद शिरसाठ, हरचंद लांडगे, रमेश शिरसाठ, रियाज मौलाना, रज्जाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक एस. सी. तेले यांनी केले. पुरस्कारार्थीं महिलांना मानाचा पिवळा फेटा बांधण्यात आला होता. सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनावरील पुस्तक, दुपट्टा, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारार्थीं मध्ये… जयश्री दिलीप पवार, माधुरी प्रमोद पाटील, डॉ. मनीषा विवेकानंद लाठी, क्रांती किशनराव पाटील, सुवर्णा कौतिक धनगर, आरती मधुकर बाविस्कर, आशाबाई रामभाऊ लांडगे, जयश्री रंगनाथ बडगुजर, मनीषा रतन पाटील, मीना भिमराव रगडे, प्रा. डॉ. शबीना शेख, सुदर्शना राजमल पाटील, आशा भीमराव महाजन, पूजा शहा, सुशीला अहिरे, भारती पवार, तिलोत्तमा पाटील, रूपाली धनगर, अश्विनी भिल्ल यांचा समावेश आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर शाहीची सूत्रे हातात घेऊन २८ वर्षे राज्याची धुरा सांभाळली. त्या प्रजाहितदक्ष, शिस्तप्रिय असल्याने त्यांच्या राज्यात कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासन उत्तम होते. त्या सर्वधर्म समभावाच्या प्रणेत्या होत्या. अहिल्याबाईंचे विचार प्रेरणादायी होते असे विचार बन्सीलाल भागवत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी वेळेचे भान राखत आपले मनोगत आटोपशीर केले. त्याग, न्याय, धर्म व समर्पणाची प्रतिभुती म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अशा महान विरांगणा चे विचार महिलांमध्ये अधिक प्रमाणात रुजायला हवेत असे सांगून सर्व पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक करुन अभिनंदन केले.
पुरस्कारार्थींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार अजय भामरे यांनी अहिल्यादेवींच्या जीवनावर कविता सादर केली. सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघ यांचे वतीने आयोजित कार्यक्रमास विविध स्तरातील नागरिक, सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अहिल्यादेवींच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेखन मंच विशेषांकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा एकतारे यांनी तर आभार प्रदर्शन आनंदा धनगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर कृ ऊ बा समिती संचालक समाधान धनगर, नगर परिषद शिक्षण समिती सभापती नितीन निळे, राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट भ. ज. सेल अध्यक्ष एस. सी. तेले, प्रदेश सदस्य भाजपा हरचंद लांडगे, हमाल मापाडी संघ अध्यक्ष रमेश शिरसाठ, मौर्य क्रांती संघ अध्यक्ष गोपीचंद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कंखरे, आनंदा धनगर, विकास सूर्यवंशी, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील यांनी परिश्रम घेतले.