
पुणे : राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) तर्फे आज दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, पुण्यातील बालगंधर्व चौक येथे मतदान चोरी विरोधात एक भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे रक्षण आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये NSUI चे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी अभय यादव, NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मतदान चोरीविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे रक्षण आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) तर्फे करण्यात आले आहे.