
चोपडा : मौजे नायगाव तालुका यावल येथील रहिवाशी तथा हल्ली बीड येथे स्थायिक असलेल्या कै.लिलाबाई मिठाराम जवागे पाटील यांचे दुःखद निधन दिनांक ११ सप्टेंबर रोजी वार्धक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७८ व्या वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पक्ष कच्चा दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. बीड येथील व्यापारी विलास पाटील व छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संजय पाटील यांच्या त्या मातोश्री होत. चोपडा येथील पंकज नगर येथील अमर डेअरी, पारले व बेली चे विक्रेते हृशिकेष पाटील व चोपडा MSEB चे तंत्रज्ञ तिलक पाटील यांच्या त्या आजी होत. अंत्ययात्रेवेळी प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, बँक कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते. दशक्रिया विधी कार्यक्रम शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी बीड येथे होणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!