सन्मानामुळे महिलांना मिळाली नवी प्रेरणा : सौ. जयश्री पाटील

ग्रामगौरव मीडियाच्या वतीने ‘साक्षलक्ष्मी’ उपक्रमातून महिला शक्तीचा जागर

अमळनेर : नवरात्र उत्सवाच्या काळात जळगाव व पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार व त्यांच्या सौभाग्यवतींना तसेच सर्व महिला प्रतिनिधी यांना ग्रामगौरव मीडियाच्या वतीने महिला शक्तीचा जागर म्हणून ‘साक्षलक्ष्मी’ हा उपक्रम राबवून सन्मानित करण्यात येत आहे. ग्राम गौरव चे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीच्या नऊ दिवसात कार्यकारी संपादिका कुमारी धनश्री ठाकरे सहकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन सन्मान करीत आहेत.

अमळनेर येथील माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या सौभाग्यवती जयश्री अनिल पाटील यांचा नुकताच ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानचिन्ह, साडी-चोळी, खण -नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी ग्रामगौरव फाउंडेशनच्या संचालिका मनीषा ठाकरे यांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात सौ. दिपा बानाईत यांनी ओटी भरण केले. मंदाकिनी भामरे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कामांबद्दल माहिती दिली. यावेळी ग्रामगौरव फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष धनश्री ठाकरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

सन्मानामुळे महिलांना मिळाली नवी प्रेरणा…

ग्राम गौरव फाउंडेशन च्या वतीने झालेल्या ‘साक्षलक्ष्मी’ सन्मानामुळे भविष्यातील नवीन वाटचालीकडे जाण्यासाठी ची मोठी ऊर्जा प्राप्त झाली असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींच्या सन्मान करणाऱ्या हा स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे समस्त महिलांना नवी प्रेरणा मिळाली आहे. या सन्मानाने आमची जबाबदारी वाढली असून यापुढेही समाजाप्रती उत्तरदायित्व निभावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

….. सौ. जयश्री अनिल पाटील, अमळनेेर.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ मंदाकिनी भामरे, महिला शहराध्यक्ष आशाताई चावरिया, जिल्हा महिला उपाध्यक्ष भारती शिंदे, शहर सचिव वैशाली ससाने, तसेच विविध महिला संस्थांच्या प्रतिनिधी यांचेसह ग्राम गौरव फाउंडेशन च्या वतीने संजय निकुंभ, अरुण इंगळे, योगेश भोई, योगेश पाटील, विशाल मैराळे, गणेश बाविस्कर, दिपा बानाईत, मोनल मैराळे आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!