
अमळनेर : आंतरराष्ट्रीय दर्जाची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया च्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी अमळनेर येथील पत्रकार बापूराव आनंदराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. पत्रकार व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी ते काम करणार आहेत. जळगाव जिल्हाध्यक्ष श्री कल्पेश महाले यांच्या सहीचे पत्र त्यांना मिळाले आहे. या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, नाशिक विभागीय अध्यक्ष मिलिंद टोके, जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांचेसह सर्व सहकारी टीमचे ठाकरे यांनी आभार मानले आहेत. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व शुभेच्छा..!