आई वडीलांचे स्वप्नाची पूर्ती करुन पियुष समाजात एक आदर्श

पियुष चौधरी बी.ए.एम.एस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

अमळनेर : येथील पियुष वैशाली काशीनाथ चौधरी याने बी.ए.एम.एस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याचे वडील काशिनाथ चौधरी हे लोकमान्य विद्यालयात विना अनुदान तत्वावर शिक्षण सेवा देत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या आईवडीलांनी पियुष ला पाठबळ दिले. पियुषने आई वडीलांचे स्वप्नाची पूर्ती करुन समाजात एक आदर्श घालून दिला आहे.
पियुष हा भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज आणि संशोधन रुग्णालय, बुटीबोरी, नागपूरचा विद्यार्थी होता. त्यास आई वैशाली व वडील काशीनाथ चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुरुजन, काका व आजी यांचे आशीर्वाद लाभले म्हणून आपण डॉक्टर बनू शकलो असे नम्रपणे सांगणारा पियुष पुढे इंटर्नशिप करतानाच उच्च शिक्षण देखील घेणार आहे. डॉ. पियुष चौधरी याचे धनंजय सोनार, चौधरी कुटूंबीय, आप्त स्वकीय, सहकारी मित्र व अमळनेर वैद्यकीय सेवारत डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!