साहित्यिक सुभाष पाटील ‘रोटरी गौरव पुरस्कार’ चे मानकरी

रोटरी क्लब ऑफ चोपडा तालुका तर्फे सन्मान

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

चोपडा : येथील रोटरी क्लब, चोपडा तर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल घोडेगाव ता. चोपडा येथील रहिवासी साहित्यिक सुभाष पाटील (घोडगावकर) यांना नुकताच रोटरी गौरव पुरस्कार शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चोपडा येथील खान्देश प्रेसमागे, बी.एड. कॉलेज समोर रविवार, दि.८ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चोपडा येथील तहसीलदार थोरात साहेब तर प्रमुख मान्यवर म्हणून चोपड्याच्या नगराध्यक्षा नम्रता पाटील उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, प्रकल्प प्रमुख संजय बारी यांचेसह क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ चोपडा गेली ५५ वर्षांपासून चोपडा शहर व तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षांपासून रोटरी क्लब तर्फे व्यापार, मनोरंजन, कृषी प्रदर्शन, खाद्य यासारख्या विविध पैलूंना स्पर्श करीत उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात तालुक्यातील लाखो लोक भेटी देत आनंद घेतात. या रोटरी उत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुपुत्रांना ‘रोटरी गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत असते. यंदा आयोजन समितीने जाहीर केल्यानुसार साहित्य क्षेत्रासाठी ‘रोटरी गौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे. सुभाष पाटील यांनी साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिले आहे. या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!