
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी ह.भ.प. भागवत दशरथ सूर्यंवंशी यांचे आज ३ मार्च रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ७१ वर्षांचे होते. खवशी येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता खवशी येथील राहत्या घरून निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!