अवैध वाळू वाहतूक बाबत आदिवासी ग्राम समितीचे प्रशासनाला निवेदन

अमळनेर : तालुक्यात बोरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून संबंधित ठिकाणच्या नागरिकांना याचा त्रास होतो. या विरोधात अमळनेर तालुका आदिवासी ग्राम समितीकडून तहसीलदार मिलिंद वाघ यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेेेेेदनात म्हटले आहे की, वाळूमाफिया हे अवैध रित्या वाळू वाहतूक करीत असून याचा संबंधित ठिकाणच्या नागरिकांना त्रास होतो याचा देखील विचार करीत नाहीत. जबरदस्ती व गुंडागर्दी करून वाळू चोरी करीत असल्याने हा प्रकार तात्काळ बंद करावा. तसेच रोजगार देखील मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तहसीलदार वाघ यांनी वाळू माफियांवर कार्यवाही करण्याचेेेे आश्वासन दिले आहे.

यावेळी आदिवासी ग्राम समितीचे अध्यक्ष आनंद पवार, मंगल भिल, नंदू भिल, मनोज भिल, पिंटू भिल, गोपाल भिल, अर्जुन भिल, विकास भिल, दिपक भिल, अरुण भिल, गणेश भिल, महादू भिल, प्रकाश भिल, लक्ष्मण भिल, करण भिल, श्रावण भिल, बाबू भिल, सोमनाथ भिल, विकास भिल, रमेश भिल, सुरेश भिल, राजु भिल, वामन भिल, भूषण भिल,नामदेव भिल, सागर भिल, शिवदास भिल, मुकेश भिल, प्रकाश भिल यांचेसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!