भाजपाची “वेट अँड वॉच” ची भूमिका निर्णायक ठरली. राष्ट्रवादीचे पवारांची खेळी भाजपाच्या पथ्थ्यावर. जनतेत संभ्रम निर्माण झाला असून शपथविधी किती योग्य ? हे येणारा काळच ठरवेल.
अमळनेर : राज्यात गेल्या महिन्याभरापासून सरकार स्थापनेचा तिढा सुटत नव्हता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी खेळी करत भाजपासोबत हातमिळवणी करीत सत्ता काबीज केली. यात भाजपाची “वेट अँड वॉच” ची भूमिका निर्णायक ठरली. या खेळीत अखेर मुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांची वर्णी लागली. राजभवनात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचे नेत्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी पार पडल्यानंतर अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.
एकीकडे आमदार साहेबराव पाटील, विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ, बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, महेंद्र बोरसे, शितल देशमुख, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, विक्रांत पाटील, नगरसेवक विवेक पाटील, निशांत अग्रवाल, शेखा मिस्त्री, बाबू साळुंखे, विनोद लांबोळे, राजेंद्र यादव, डॉ. पुरुषोत्तम पाटील, झुलाल पाटील, गुलाब पाटील, सुभाष पाटील, ईश्वर बडगुजर, इम्रान खाटीक, देवा लांडगे, रवि ठाकूर, योगेश पाटील, राकेश पाटील, महेंद्र महाजन, गोकुळ परदेशी, सुभाष भोई, गौरव माळी, रविंद्र पाटील, दिलिप ठाकूर, शेखर खैरनार, शफी खाटीक, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे विजय मारुती जवळ माजी आमदार शिरीष चौधरी, अँड.व्ही.आर पाटील, सुनील भामरे, लालचंद सैनानी, कल्याण पाटील, नगरसेवक सलीम टोपी, अविनाश जाधव, बाळासाहेब संदानशिव व शिरीष चौधरी मित्रपरिवारातील कार्यकर्तेेे होते.
बहुमत सिध्द न करता एका रात्रीत निर्णय घेवून पहाटे ५.३० वाजता राष्ट्रपती राजवट उठवण्यात आल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे झालेला शपथविधी किती योग्य हे येणारा काळच ठरवेल.

