संमेलन यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्यांचाही सन्मान

अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सुरु असलेल्या पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाचा आज (ता २४) रोजी दुपारच्या सत्रात ग.स.बँकेचे उपाध्यक्ष शामकांत भदाणे यांचे अध्यक्षतेखाली ‘दर्याची लेकरं’ या लोकगीतांच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, खा.शि.मंडळाच्या विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे, कवी रमेश पवार, ॲड. मनोहर भांडारकर, प्रल्हाद बाविस्कर, सौ विजया बाविस्कर, स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ आदी मान्यवर यांची उपस्थिती होती.

सुरुवातीस दिप प्रज्वलन करण्यात येवून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याचवेळी वरळी मुंबई (हरणे बंदर) येथील शाहीर चिंतामणी शिवडीकर यांचेसह कलाकारांनी “दर्याची लेकरं” हा पारंपारिक लोकगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सुरुवातीस गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गणपती गीत अशी नार मी झाली गणपतीचे सणाला गं, सदानंदाचा.. आई देवीचा, देव माझा मल्हारी, जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा, जेजुरीचा खंडेराया जागराला या या, खंडेरायाच्या लग्नाला.. बानू नवरी नटली, राष्ट्रपती पदकप्राप्त चांदणं चांदणं पीटभर चांदणं.., माझा कोंबडा कोणी मारीयला, कोळीगीते – वेसावची पारु नेसली गो नेसली नव सारा.., अगो दारु ताडी केली सरकारनी बंद कैसे करु सोले (सण), डोल डोलतय वाऱ्यावर, मी बाई कोळी, नाकवा जाऊ कसा लाटांचा मारा, कोळी वाल्या दादा, दर्याच्या पाण्या आलं तुफान, पॉप्लेट वाली… अशी बहारदार कोळीगीते सादर करुन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांनीही यावेळी ठेका धरला.
समारोपाच्या भाषणात श्यामकांत भदाणे म्हणाले की, ‘खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनातून पू. सानेगुरुजी ग्रंथालयाचा प्रगतीचा आलेख उंचावला आहे. अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रम व अनुभवातून संस्थेची भरभराट होत राहील’ अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ.अविनाश जोशी यांनी ‘संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्यांच्या प्रयत्नांना प्रेक्षकांनी भरघोस उपस्थितीने प्रतिसाद देण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलन नव्या साहित्यिक वर्गाला प्रोत्साहन देणारे ठरल्याने खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे मत सौ.वसुंधरा लांडगे यांनी मांडले.
याप्रसंगी पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल आयोजकांनी पत्रकार संघाचा सन्मानचिन्ह देवून सन्मान केला. पत्रकार संघाचे चंद्रकांत पाटील, ईश्वर महाजन, संजय सूर्यवंशी, पत्रकार मित्र रणजित शिंदे, दिनेश नाईक यांनी हा सन्मान स्विकारला. संमेलन यशस्वितेसाठी बहुमोल सहकार्य करणारे नगिनचंद लोढा, विजया गायकवाड, रणजित शिंदे, प्रा डॉ शैलजा माहेश्वरी, गोकुळ बागुल, दिनेश नाईक, धनंजय सूर्यवंशी, जितेंद्र सोनवणे, प्रा.लिलाधर पाटील, प्रा. डॉ. प्रभाकर जोशी, ॲड. तिलोत्तमा पाटील, सौ कांचन शहा, विकास ब्राह्मणकर, शैलेश काळकर, विजयसिंग पवार, सोमनाथ ब्रह्मे, रुपाली पवार, अपेक्षा पवार, संजय पवार, प्रकाश धर्माधिकारी, डॉ. राजेंद्र पिंगळे, प्रेस फोटोग्राफर महेंद्र पाटील, हेमंत भांडारकर, निलेश वाघ, सतिष कांगणे, सोनाली पवार, विजय पाटील, नितीन भदाणे, मुंबईचे कलाकार चिंतामण शिवडीकर, विलास वरळीकर, वसुधा वरळीकर, प्रमिला वरळीकर, रुपेश मुरुडकर, संदेश मुरुडकर, शशांक प्रभू, विनायक माहे आदींचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समारोप संभारंभास पू साने गुरुजी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ माधुरी भांडारकर, चंद्रकांत नगावकर, पी. एन. भादलीकर, भीमराव जाधव, ॲड. रामकृष्ण उपासनी, निलेश पाटील, दिपक वाल्हे, प्रसाद जोशी आदि संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सिमा धाडकर, सुरेश जोशी, रमेश सोनार, बाळापूरे आदींनी परिश्रम घेतले. आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.