सिंधी समाजाचा लाल लोही सण उत्साहात साजरा

अमळनेर : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असणारा सिंधी समाज बांधवांचा लाल लोही सण उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीतील चौका चौकात लाल लोही पुजन करण्यात आले.
ज्याप्रमाणे होलीकापुजनाचा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे सिंधी समाज बांधव लाल लोही सण साजरा करतात. आपल्या जीवनातील समस्या व प्रश्न सुटावेत यासाठी देवाची आराधना करून नवस मानण्यात येतो. ज्यांच्या समस्येचे निर्मुलन झालेले आहे असे भाविक आपला नवस फेडतात. यावर्षीही भाविकांनी नवस फेडले. होळी सारखे मध्यभागी प्रज्वलीत केलेल्या अग्नीभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधवांनी उत्साहपूर्ण वातावरणात लाल लोही सण साजरा केला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!