अध्यक्षपदी तुषार रंधे यांची तर उपाध्यक्षपदी कुसूम निकम

धुळे : येेेथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा पटेल गटाचे वर्चस्व राहिले आहे. जिल्हा परिषद निवडीमध्ये अध्यक्षपदी भाजपकडून तुषार रंधे यांची तर उपाध्यक्षपदी कुसूम निकम यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजप विरोधात महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी विश्वनाथ बागुल तर उपाध्यक्ष पदासाठी पोपटराव सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता यामुळे मतदान घेण्यात आले. दरम्यान भाजपच्या बाजूने ४० तर विरोधात १६ सदस्यांनी मतदान केल्याने भाजपचा विजय झाला आहे.
तुषार रंधे हे शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील स्वातंत्र्य सेनानी स्व.व्यंकटराव रणधीर यांचे नातु असून दुसऱ्यांदा जि.प.सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ते शिरपूर किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तर मर्चंट बँकेच्या संचालकपदी कार्यरत आहेत. सौ.सिमा तुषार रंधे या देखील माजी जि.प.सदस्य आहेत.