अमळनेर : येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या एन आर सी ,सी ए ए विरोधी साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्याने अमळनेरला आंदोलनाची तिव्रता वाढली आहे. अमळनेरला १ फेब्रुवारी पासून सुरू झालेले बेमुदत साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी शहराच्या कसाली मोहल्ला, जपान जिन, दर्गा अली, मिलचाळ, बाहेरपुरा, इस्लामपुरा, अंदरपुरा आदी विविध भागातून शेकडोंच्या संख्येने मुस्लिम महिला उपोषणात सहभागी झाल्या. अनेक महिला कार्यकर्त्यांनी एन आर सी व सी ए ए कायद्याबाबत यावेळी केलेल्या भाषणात संताप व्यक्त केला. ‘एन आर सी म्हणजे भारतीय नागरिक म्हणून असलेल्या आमच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित करण्याचे केंद्र सरकारने रचलेले षडयंत्र आहे!’ असा सूर सलमा बाजी , माजी नगरसेविका रबिया आपा, रजिया मॅडम, जसमीन बाजी, साबिया बाजी, नसिम मॅडम, समरीम मॅडम आदी महिला वक्त्यांनी व्यक्त केला. आंदोलनात विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. समता कला मंच चे सिद्धार्थ सपकाळे, भारती मोहिते, मनीषा मोरे, सपना संदानशिव, दिपक मोहिते, भूषण शिरसाठ, आकाश खैरनार, आकाश साळवे, प्रियंका संदानशिव आदींनी विविध गीते सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमाने जनजागृती केली. शाहरुख सिंगर यांनी राष्ट्रभक्ती पर गीते सादर केलीत.
महिला कार्यकर्त्या भारती गाला, संदिप घोरपडे, युवा कार्यकर्ते पंकज चौधरी, बाळासाहेब सदांनशिव, धनराज महाजन, नगरसेवक फिरोज पठाण, प्रा.डॉ राहुल निकम, प्रा.डॉ.दिलीप कदम, सुरेश झाल्टे, प्रा.अशोक पवार, रामभाऊ संदानशिव, माजी निवृत्त जिल्हाधिकारी एच.टी.माळी, रणजित शिंदे, गौतम सपकाळे, प्रा.शिवाजीराव पाटील, फैयाज पठाण, सत्तार मास्टर, जितेश संदानशिव, शेखा हाजी, नरेंद्र संदानशिव, योगेश कापडने, ॲड. रणजित बिऱ्हाडे, ॲड. गजरे, किरण बहारे, लताबाई मंगा जाधव, ॲड. रज्जाक शेख, अय्युब पठाण, शराफत मिस्तरी, रहीम मिस्तरी, सुलतान खान, खालिद अहेलेकार, अखतर अली, रईस भाई, शाहिद भाई, अखतर गुलाम नबी, अजीम शेख, शेर खा पठाण, हाजी मुझफ्फर, बिस्मिल्ला अहेलेकार, गुलाम नबी, इमरान खाटीक, नुरू शेख, अर्षद अली आदींसह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.