लोकशाही बचाव नागरी कृती समितीतर्फे जाहीर सभेचे आयोजन

राजकीय विचारवंत व कृषी चळवळीचे मार्गदर्शक प्रा. योगेंद्र यादव सभेला संबोधित करतील.

अमळनेर : येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने भारत, संविधान, लोकशाही या विषयावर जाहीर सभेचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेसाठी राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव, विद्यार्थी नेता- वक्ता उमर खालिद, गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी हे ता. ८ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता अमळनेरला येत आहेत.

कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून जागतिक कीर्तीचे राजनीतिक विश्लेषक, लेखक, वक्ते , राजकीय विचारवंत व कृषी चळवळीचे मार्गदर्शक प्रा. योगेंद्र यादव सभेला संबोधित करतील. याशिवाय शोषितांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवक चळवळीचे राष्ट्रीय नेते, फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध वक्ते गुजरात विधानसभेचे आमदार जिग्नेश मेवानी तसेच विद्यार्थी चळवळीचे युवा नेतृत्व, भगतसिंग-आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते उमर खालिद हे ही मार्गदर्शन करणार आहेत.
आमदार अनिल भाईदास पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.कृषीभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा जिजामाता कृषीभूषण पुष्पलता पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई पाटील, जळगांव येथील करीम सालार हे उपस्थित राहणार आहेेत. अमळनेर मधील देशप्रेमी, संविधान प्रेमी युवक, नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकशाही बचाव नागरी कृती समिती,अमळनेरच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!