अमळनेर : येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या साखळी उपोषणाला ७ व्या दिवशीही विविध सामाजिक संघटना, युवकांचा वाढता पाठींबा मिळाला. मराठा सेवा संघ,राष्ट्रीय किसान मोर्चा, सत्यशोधक समाज, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मेहतर समाज, लब्बाइक युवा ग्रुप आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी NRC, CAA रद्द करा मागणी करत साखळी उपोषणाला ७ व्या दिवसापर्यंत हजेरी लावून आंदोलनाचे बळ वाढवले. आंदोलन मंडपाच्या वर तिरंगा झेंडा डौलाने फडकत असतो. तर ‘दिल दिया है जान भी देंगे.. ए वतन तेरे लिए ।’, ए वतन हमको तेरी कसम।, देखो वीर जवानो अपण ओए ए एन्झाम न आये।, ये देश है वीर जवानों का।, मेरे देश प्रेमियो आपस मे प्रेम करो। असे एक ना अनेक देशभक्तीच्या गीतांनी सहभागी युवक कलाकारांनी आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण केले आहे.
साखळी उपोषण आंदोलनात मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा.शिवाजीराव पाटील, गावरान जागल्या संघटनेचे विश्वास पाटील, सत्यशोधक समाजाचे जयवंत शिसोदे, बहुजन क्रांती मोर्चा चे रणजित शिंदे, प्रा जितेश संदानशिव,आसाराम बाविस्कर, दिनकर बिऱ्हाडे, ओम संदानशिव, दिनकर बिऱ्हाडे यांचे सह रियाज मौलाना, काँग्रेसचे धनगर दला पाटील, प्रताप नगराज पाटील, राष्ट्रीय मेहतर समाजाचे सरपंच रमेश घोगले, नगरसेविका मायमाई कैलास लोहरे, राजू चंडाले, संतोष लोहरे, विकास जाधव, अनिल कसोरिया, बेबी कल्याण्ये, कंचन चव्हाण, भावना पवार, गीता खरारे, नर्मदा चव्हाण, सुनिता चव्हाण, मंगला लोहरे, ठाकूर मुनिर फतरोड, राम चंडाले, पप्पू कलोसे, बिंदूकुमार सोनवणे, मा नगरसेवक राजू जाधव, जगन पवार, दिपक हटवाल, करण पवार, महेश बारसे, तरुण सांगळे, गुरुचरण पवार, रत्न बाबू जैधे, उमेश कलोसे, निलेश कलोसे, नरेंद्र घोगले, कैलास कलोसे आदिंसह मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. लाब्बाईक ग्रुप चे दिलावर मिस्तरी, नियाजुद्दीन नसीर शेख, मुसा शेख,अफजल काझी, इरफान शेख, इकबाल, इरफान शेख, इमरान शेख, सईद शेख, अश्फाक शेख, शमिर, जुबेर शेख आदिंसह मोठ्यासंख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.