अमळनेर : ‘सरकार कडे एका हातात दंडा, दुसऱ्या हातात मिडिया ची गच्ची आहे. खिश्यात प्रचंड पैसा आहे तर आमच्याकडे फक्त आमची आई ..धरती माता आहे. सी ए ए, एन सी आर, एन पी आर विरोधी लढाई ही धरती मातेसाठीची लढाई आहे’ असे स्वराज हिंद चे योगेंद्र यादव म्हणाले. लोकशाही बचाव नागरी कृती समितीने हिंदुत्ववादी संघटनांच्या कडव्या विरोधानंतर, पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही योगेंद्र यादवांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जाहीर सभा झाली. हजारो नागरिकांनी खचाखच भरलेल्या या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांंनी दिवार चित्रपटातील अभिताब व शशी कपूर यांचा संवादही ऐकविला. स्वराज हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी नाट्यगृहाच्या परिसरात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्प अर्पण करीत पूजन केले. इंनक्लाब जिंदाबाद, जय जिजाऊ जय शिवराय, हम सब एक है, भारत माता की जय घोषणांनी सभेला सुरवात झाली. जळगांव चे नेते करीम सालार , मुकुंद सपकाळे यांनी स्वातंत्र्याच्या अधिकाराव घाला घालणाऱ्या संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या बेगडी हिंदुत्ववादी संघटनांचा तिव्र निषेध नोंदवला. यावेळी विचार मंचावर आमदार अनिल पाटील, माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई शिंदे, मुकुंद सपकाळे, करीम सालार, जयवंत पाटील, नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील, भारती गाला, सचिन धांडे, रामभाऊ संदानशिव, गोकुळ बोरसे, मनोज पाटील, संदिप घोरपडे, प्रा.अशोक पवार, मुख्तार खाटीक आदी मान्यवर होते.
श्री योगेंद्र यादव पुढे म्हणाले की, संविधानाच्या पहिल्याच पानावर स्वातंत्र्याचा कलम १५, १९, २१ उल्लेख आहे. या देशाचे संविधान ज्यांनी वाचले नाही ते आज आझादी, स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील भाषणात मी भारतीय असल्याचा गर्व आहे असे म्हटले कारण आमच्या धरतीवर ज्यांनी ज्यांनी शरण मागितली त्यांना त्यांचा धर्म न विचारता शरण दिले आहे. लोकांनी विवेकानंदांना समजून घेतले पाहिजे. मी राष्ट्रात नाही तर महाराष्ट्रात, संतांच्या भूमीत, स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींच्या भूमीत उभा आहे. हिंदी माझी मातृभाषा तर मराठी माझी मावशी आहे असे सांगत उमर खालिद कार्यक्रमाला येऊ न शकल्याचे दुःख व्यक्त केले. मागील काही वर्षांपासून श्रीलंकेतून प्रताडीत होऊन भारतात येऊन बसलेले हिंदू तामिळी लोकांना, नेपाळ, तिबेट मधून आलेले प्रताडीत बौद्ध नागरिकांना अजूनही पंतप्रधानांनी नागरिकता दिलेली नाही. आधी त्यांना द्या ! सी ए ए कायदा इतर देशातील नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी नाही तर मुस्लिम समाजाला वेगळं पाडण्यासाठी केलेला कायदा आहे. २२ फेब्रुवारी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी पासून ते २३ मार्च भगतसिंग यांच्या शहीद दिवसापर्यंत देशभर एन पी आर, एन आर सी, सी ए ए विरोधात असहकार आंदोलनाविषयी देशभर जनजागृती चळवळ उभारली जाईल असे योगेंद्र यादव यांनी जाहीर केले.
उमर खालिद यांचे मोबाईल क्लिप द्वारे आवाहन…
प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता कार्यक्रम घेणाऱ्या नागरिकांना सलाम ! मी तुमच्यात येऊन तुमच्या संघर्षाची धार वाढविण्यासाठी उत्सुक होतो मात्र.. आर.एस.एस ने हिंदू मुस्लिम द्वेष वाढवून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने मला येण्यापासून रोखले तरी मी लोकांच्या आंदोलनात लवकरच येऊन सहभागी होईल.
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आमच्या घरात आम्हालाच चोरी अश्या आशयाची अहिराणी म्हण सांगत सभेला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की, सभेला परवानगी दिली असती किंवा नसती तरी आम्ही सभा घेतलीच असती. एन आर सी साठी माझ्याच आजल्यांची माहिती मिळवणं कठीण आहे तिथं सर्वसामान्य नागरिकांचे काय होईल ? म्हणून आम्ही देशभर एन आर सी विरोधी आंदोलनाच्या पाठीशी आहोत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकशाही बचाव नागरी कृती समिती चे रामभाऊ संदानशीव, प्रा.अशोक पवार, रियजुद्दीन मौलाना, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, अँड.शकील काझी, गौतम सपकाळे, प्रा.लिलाधर पाटील, पन्नालाल मावळे, अँड.रज्जाक शेख, भारती गाला, फैय्याज पठाण, सत्तार मास्टर, शराफत अली, राजू शेख, नगरसेवक शेखा हाजी, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, फिरोज पठाण, सिद्धार्थ संदानशिव, प्रा.शिवाजीराव पाटील, विश्वास पाटील, शाहरुख सिंगर, इमरान खाटीक, मुझफ्फर हाजी, खालिद भाई, जुबेर अझहर, अय्युब पठाण, गुलाम नबी, नावेद शेख, शेर खा पठाण, रोनक शेख, शफी पहेलवान आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रा.अशोक पवार यांनी सूत्रसंचालन केले. समता कला मंच व शाहरुख सिंगर यांनी सांस्कृतिक विद्रोही गीते व देशभक्ती पर गीते सादर केली.

