जिल्ह्याची रेडझोनकडे सुरू असलेली वाट रोखण्यासाठी प्रशासनाला जनतेच्या सहकार्याची खरी गरज

अमळनेर शहरातील साळीवाडा, अमलेश्वर नगर परिसर ठरतोय कोरोना हॉटस्पॉट

जळगाव : जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन काल आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ११ झाली आहे. कोविड रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील या पाचही व्यक्ती आहेत. यात चार पुरुष व एका ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आता जिल्ह्याची वाटचाल रेडझोनकडे सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुरुवातीला दोन रूग्ण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण बरा झाला. त्यानंतर अमळनेर तालुक्यात चार रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. प्रशासनाने सतर्क राहून अमळनेर शहरात संबंधित परिसर सील करुन संचारबंदी लागू केली आहे. मात्र त्या परिसरातील आणखी पाच रूग्णांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने प्रशासनापुढे जिल्ह्याची रेडझोनकडे सुरू असलेली वाट रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्याची रेडझोनकडे सुरू असलेली वाट रोखण्यासाठी प्रशासनाला जनतेच्या सहकार्याची खरी गरज आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!