भानुबेन शहा गौ शाळेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी अन्नदान म्हणून एक दिवसाचा खर्च

अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत १.५२ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. त्यापैकी यापूर्वीच २१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तहसीलदार मिलिंद वाघ यांचेकडे सुपूर्द केला आहे. तर पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २१ हजारांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
अमळनेर शहरात भानुबेन बाबुलाल शहा गौ शाळेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी सुरू असलेल्या अन्नदानाचान एक दिवसाचा खर्च १ लाख १० हजार रुपये गौ शाळेचे सचिव चेतन शहा, प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, राजू शेठ यांचेकडे सुपूर्द केला. याप्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम उपस्थित होते. संस्थेने सॅनिटायझर्स व मास्कचेही मोफत वितरण केले आहे.

