श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे होणारे अन्नदान समाजसेवेचा खरा आदर्श : ना. गुलाबराव पाटील

ना. गुलाबराव पाटील यानी दिले मुलाच्या जन्मदिवस निमित्ताने एक दिवसाच्या अन्नदान खर्चाचे योगदान

अमळनेर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर येथील लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी वर्धमान संस्कार धाम मुंबई प्रेरित श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे अमळनेरातील हजारो गरजू कुटुंबांना नियमितपणे आपापल्या परिसरात अन्नदानाचे कार्य सुरु आहे. जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी अन्नक्षेत्रास स्वतः भेट दिली व सुरू असलेल्या अन्नक्षेत्र कार्याची पाहणी केली. गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा स्वतःही आस्वाद घेतला. ना. गुलाबराव पाटील यानी मुलगा जि.प.सदस्य प्रताप पाटील च्या जन्मदिवस निमित्ताने एक दिवसाच्या अन्नदान खर्चाचे योगदान दिले. अत्यंत अडचणी च्या काळात गोरगरिबांसाठी गोशाळेतर्फे होणारे अन्नदान समाजसेवेचा खरा आदर्श आहे असे मत ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार अनिल पाटील, आ.स्मिताताई वाघ, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे या मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेेेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील, माजी शहरप्रमुख प्रताप शिंपी, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, उपशहरप्रमुख जीवन पवार, सुरज परदेशी, विजय पाटील यांचेसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,

या सेवाभावी अन्नक्षेत्र कार्यात स्थानिक सामाजिक संस्था, दानशूर दाते, शिक्षक मंच, नगरसेवक यांच्यासह लोकही दातृत्व दाखवित आहेत. यामुळे शहरात दोन हजार लोकांपासून सुरू झालेले अन्नदान कार्य २० केंद्रांवर आज जवळपास अकरा हजारापेक्षा जास्त गोरगरीब लोक आपापल्या भागातच यशस्वीपणे थांबवून ठेवण्यात यश आलेले आहे. हजारो गरजवंतांना वेळेवर जागेवर जेवण पोहचवताना मात्र रोज लागणारा खर्च जमविण्याचे आव्हान गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांसमोर असते. गोक्षेत्र प्रतिष्ठाण ला हजारो गोरगरिबांच्या अन्नदानासाठी मदतीच्या दातृत्वासाठी आता अमळनेर ला मदर युनिट असलेल्या विप्रो कंपनी कडून मदतीची अपेक्षा असून त्याबाबतचा संस्थेने विप्रोशी पत्रव्यवहार केलेला आहे. श्रीमती भानूबेन शाह गोशाळाचे संचालक शाह , राजू सेठ, महेंद्र पाटील आदिंनी अन्नक्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रा अशोक पवार, चेतन सोनार, संदीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, कार्यकर्ते डी.ए.धनगर, गोपाळ कुंभार आदिंसह अनेक भागातील कार्यकर्ते, स्थानिक आजी माजी नगरसेवक व युवक नियमितपणे सक्रिय कार्य करीत आहेत. तर या कार्यात सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ऑनलाइन न्यूजपोर्टल व सोशल मिडियातील पत्रकार यांचेही सक्रिय योगदान लाभत आहे.

हजारो कुटुंबाना अन्नदानामुळे दिलासा मिळालेला असून सदरचे अन्नदान सुरू रहावे यासाठी आता स्थानिक संस्था,संघटना यांनी मदत देत पुढाकार घेतला आहे. अमळनेर शहरातील आदिवासी मागास वस्ती असलेल्या रुबजी नगर परिसरात ३ केंद्र,टाकरखेडे रस्ता म्हाडा येथील वस्ती १, रेल्वे स्टेशन पलिकडील भाग बंगाली फाईल १, खाँजा नगर १, शाह आलम नगर १, ताडेपुरा ४, पैलाड अण्णाभाऊ साठे वस्ती १, वर्णेश्वर रोड वस्ती १, चोपडा रोड स्मशान भूमी समोर १, गांधलीपुरा १, मांगवाडा नदीकाठ परिसर १, मिलचाळ १, धर्मशाळा परिसर १, गलवाडे रोड पुलाखाली १, पळासदडे रोड भानूबेन शाह गोशाळा १ आदि २० केंद्रांवर नियोजनबध्द अन्नदान होत आहे. या अन्नदान कार्यात योगदान देण्यासाठी आवाहन गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळा अमळनेर तर्फे करण्यात आले आहे. योगदान देण्यासाठी चेतन शहा ७०२८८९५२०१, प्रा.अशोक पवार ९४२२२७८२५६, चेतन सोनार ७७४४०२२४१९, संदीप घोरपडे ८२७५०५४३१०, रणजित शिंदे,९४२२२८२४८९ आदिंना संपर्क केल्यास दात्याकडून धान्य, वस्तू अथवा रोख, चेक स्वरूपात स्विकारले जाणार आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!