
अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील झामी चौक, आमलेश्वर नगर इ. कॉन्टिनेंटल झोन (रेड झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या भागात जाण्यासाठी प्रशासनाकडून पन्नालाल चौक येथे एकच प्रवेश ठिकाण करण्यात आले आहे. दि अमळनेर अर्बन बँकेच्या सौजन्याने तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाने याठिकाणी निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांचे उपस्थितीत या प्रवेशद्वाराचा नागरिकांसाठी आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, बॅंकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्यवस्थापक अमृत आबा पाटील, संचालक लालू शेठ, शांताराम ठाकूर, प्रवीण जैन, प्रदीप अग्रवाल, अभिषेक पाटील, भरत ललवाणी, बाळासाहेब संदानशिव, पंकज चौधरी, कर्मचारी प्रवीण सातपुते, अवी जाधव, किरण बागुल, विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. अर्बन बँकेच्या सौजन्याने सुरु झालेल्या या कार्याचे मान्यवरांनी कौतुक करून आभार मानले.