
अमळनेर : सध्या देशभर कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने अमळनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अमळनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
अमळनेर पो. स्टे. अंतर्गत आज दिनांक ४ मे रोजी सायंकाळी पोलीस ग्राउंडवर पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. साई सेवा हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत शिंदे यांचे सहयोगाने ५ अधिकारी व ६५ पोलीस कर्मचारी यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या वैद्यकीय तपासणीचे नियोजन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व गोपनीय शाखेचे शरद पाटील यांनी केले. मोफत वैद्यकीय तपासणी केल्याबद्दल डॉक्टरांचे विशेष आभार मानले. त्यांनी यापुढेही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मेडिकल शिबिरासाठी नियोजनात सपोनि एकनाथ ढोबळे, सपोनि प्रकाश सदगीर, पीएसआय राजेंद्र माळी, पीएसआय गणेश सूर्यवंशी, दिपक माळी, रवींद्र पाटील, हितेश चिंचोरे, योगेश महाजन हजेरी मास्टर संजय पाटील आदिंनी मेहनत घेतली.