हजारो गोरगरीबांना वरण बट्टी चे भोजन देत लग्नाचा वाढदिवस साजरा

श्रीमती भानूबेन गो शाळेच्या माध्यमातून आगळा वेगळा उपक्रम; मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे दातृत्व

अमळनेर : येथील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवस निमित्ताने कोरोना लॉक डाउन परिस्थितीत अमळनेर शहरातील हजारो गोर गरीब नागरिकांना श्रीमती भानूबेन गो शाळेच्या माध्यमातून वरण बट्टी चे भोजन देत आज (ता.५) लग्नाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला .

अमळनेर शहरात सुरू असलेले अन्नदान क्षेत्राला आर्थिक अडचणी येत असतांना कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचा अन्न दान खर्च केला होता. पुन्हा आज लग्नाला ४६ वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी स्वतः पांचाळ वस्ती, व्हाइट बिल्डिंग येथे उपस्थित राहून गोर गरीब नागरिकांना वरण, बट्टी, भाजी चे जेवण वाटप केले. अमळनेर शहरातील १७ केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत अन्नदान करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः उपस्थित लोकांना मास्कचे ही वाटप केले. याप्रसंगी दलित नेते रामभाऊ संदानशिव, गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या श्रीमती भानूबेन शहा गोशाळेचे वतीने प्रा.अशोक पवार, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नगरसेवक निशांत अग्रवाल, निलेश साळुंके, बन्सीलाल भागवत, बोरसे आबा आदि मान्यवर उपस्थित होते. व्हाइट बिल्डिंग परिसरातील अन्नदानासाठी रोहित अग्रवाल, नितीन उपाध्याय, प्रशांत उपाध्याय, निखिल कोठारी, मोहीत अग्रवाल, दिनेश परदेशी, प्रतिक शहा आदिंनी परिश्रम घेतले. गोक्षेत्र प्रतिष्ठाण चे संचालक चेतन शहा, चेतन सोनार, संदिप घोरपडे यांनी कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या दातृत्वासाठी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!