महिला पत्रकार प्रा.जयश्री साळुंके यांनी आपल्या जन्मदिनी गोरगरिबांना अन्नदान करुन जपली सामाजिक उत्तरदायित्वाची भावना

अमळनेर : येथील प्राध्यापिका तथा महिला पत्रकार प्रा.जयश्री साळुंके यांनी आपल्या जन्मदिनी गोरगरिबांना अन्नदान करुन सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपली. त्यांनी गोशाळेमार्फत गोरगरिबांना होणाऱ्या अन्नदानासाठी गहू,तांदूळ,तेल आदि खाद्यवस्तू भेट देऊन अन्नदानासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये केक कापून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत जन्मदिवस साजरा केला.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन काळात कोरोना योद्धा म्हणून शहरातील हजारो गोरगरिबांना अन्न देण्यासाठी झटणाऱ्या गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या श्रीमती भानूबेन शहा गोशाळेत प्रा.जयश्री साळुंके यांनी गरीब गरजुंसाठी सुरू असलेल्या अन्नदानाकरता गहू १० पोती, तांदूळ २ पोती, तेल १ खोके, मीठ पाकिटे आदि खाद्य वस्तू गोशाळेचे संचालक चेतन शहा व सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, गोपाळ कुंभार यांच्या स्वाधीन केली. गोशाळा परिसरातील मोल मजुरी करणाऱ्या शेकडो लोकांना यावेळी स्वहस्ते पुरी-भाजी चे वाटप ही केले. त्याच प्रमाणे ताडेपुरा भागातील रहिवाशांना देखील अन्ननदान करण्यात आले. यावेळी गोशाळेच्या कार्यकर्त्यांनी प्रा.जयश्री साळुंके यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यासोबत त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांसाठी त्यांचे अभिनंदन केले. शहरातील त्या एकमेव महिला पत्रकार असूून त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत जन्मदिवस साजरा केला. याप्रसंगी मनोज पवार, पुनमचंद पारधी, योगेश चौधरी, सुनील पवार, अर्जुन सरोदे, अजय पारधी, भीमराव पारधी, राजेश पारधी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!