सोमवार पासून अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्र व बाजार समिती सुरु होणार : आमदार स्मिता वाघ

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग चे काटेकोर पालन करण्यासाठी दिवसभरात २० वाहनांची मोजणी होणार

अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली अमळनेर येथे शासकीय कापूस खरेदी सोमवार, ता.१८ पासून सुरु होणार आहे. नोंदणी केलेल्या कापूस उत्पादकांना कृषी उपन्न बाजार समिती मार्फत नोंदणी क्रमांक नुसार कळविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या समवेत आ.स्मिता वाघ यांनी अमळनेर येेेेथील बंद असलेली शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी चर्चा केली होती त्यानंतर कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार होते. दरम्यान अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्ण संख्या शंभरीपार गेल्याने खबदारीचा उपाय म्हणून सदर केंद्र विशेष शासकीय आदेशान्वये बंद करण्यात आले होते.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सद्यस्थितित मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असून आगामी हंगाम जवळ आल्याने कापूस खरेदी केंद्र सुरु होणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार आ.स्मिता वाघ यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेवून कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग चे काटेकोर पालन करत सोमवार, ता.१८ पासून अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्र व कृषी उपन्न बाजार समिती सुरु होणार आहे. यासाठी दिवसभरात २० वाहनांची मोजणी केली जाणार असून संबधित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उपन्न बाजार समिती मार्फत कळविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त वाहन आल्यास त्याची मोजणी केली जाणार नाही असे बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार व संचालक मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!