
अमळनेर : तालुक्यातील गांधली- पिळोदे येथील बालाजी विद्यालयाचे उपशिक्षक तथा तालुका हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष दिलीपराव शिंदे हे राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित प्राध्यापक पदासाठी च्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यांना प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.ललित मोमाया, धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद पवार, प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्रा.डॉ.विजय तुंटे, इकरा महाविद्यालय जळगाव चे प्रा.डॉ.वकार शेख, प्रा.उमेश गोगाडिया, प्रा.डॉ.गौतम भालेराव यांचे मार्गदर्शन मिळाले.
शिंदे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामविकास शिक्षण संस्था, मुडी चे प्र.अध्यक्ष पंजाबराव सूर्यवंशी, संचालक रमेश पाटील, सचिव सुनील पाटील, बालाजी विद्यालय चे अध्यक्ष गिरीष शिंदे, संचालक शिवाजीराव पाटील, गोविंदराव कचवे, जयवंतराव पाटील, विजय जैन, अँड.वेद्व्रत काटे, कमलाकर पाटील, दिलीप शिंदे, पी व्ही पाटील, एस.एच पाटील, डी.सी.पाटील, हर्षल सोनवणे, संतोष पाटील, किशोर पाटील, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नंदुरबार चे API किरण पवार, नेवासाचे PI जनार्दन सोनवणे, नाशिकचे जिल्हा सांंख्यिकी अधिकारी नितीन पाटील, अमळनेर चे बीडीओ संदीप वायाळ, अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.