अवयवदान बाबत देशातील नागरिक अनभिज्ञ : डॉ.नरेंद्र ठाकूर

पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय स्मृती व्याख्यानमालेतील सूर.

अमळनेर : इतर देशांत माणसाच्या शरीरावर देशाचा अधिकार असतो पण आपल्या देशात शरीरावर नातेवाईकांचा अधिकार असतो. ग्रामीण भागातील लोकामध्ये याची जागृती होवून अवयवदान करणे काळजी गरज आहे. देशातील नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत असे मत डॉ.नरेंद्र ठाकूर, जळगांव यांनी व्यक्त केले. येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात नुकत्याच झालेल्या व्याख्यानमालेत “देहदान व अवयवदान” या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कै.प्रा.श्रीमती पद्माबाई तेजस्वी निजसुरे व प्रा.टी.एच.बारी यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून दरवर्षी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्यासपीठावर व्याख्याते डॉ नरेंद्र ठाकूर, जळगाव यांचेसह प्रमुख पाहुण्या म्हणून शिरसाळे येथील जि.प.शाळेच्या शिक्षिका मनिषा चौधरी, वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा डॉ. माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ होते.

श्री ठाकूर पुढे म्हणाले की, आपला देश अवयवदानात मागे आहे. अन्य देशात अवयवदानाचा प्रचार जास्त असल्याने अवयवदानात तेथील नागरिक अव्वल आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे. सुमारे पाच लाख लोकांना अवयवदानाची गरज आहे. आज दोन लाख लोकांना लिव्हरची,  दोन लाख लोकांना मुत्रपिंडाची तर इतर एक लाख लोकांना अन्य अवयवदानाची गरज आहे. पैशाच्या जोरावर अवयवदान होत नाही. कायदेशीर बाबी पुर्ण झाल्याशिवाय होत नाही. अवयवदान कोण करू शकतो ? या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुज्य सानेगुरुजी यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांचा परिचय प्रकाश वाघ व विजयसिंग पवार यांनी केला. वाचनालयातर्फे मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. अमळनेर येथील देशमुख वाडा परिसरातील सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर सुपडु भामरे व मीना सुधाकर भामरे या दाम्पत्याने देहदानाचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अशोक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. व्याख्यान मालेला प्रा.डॉ रमेश माने, सानेगुरुजी शाळेचे मुख्याध्यापक सतीश देशमुख, सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील, शिक्षक अशोक पाटील, चंद्रकांत पाटील होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे कार्यकारणी सदस्य पी. एन. भादलीकर, भीमराव जाधव, ईश्वर महाजन, प्रसाद जोशी, सुमित धाडकर, दिपक वाल्हे व वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड रामकृष्ण उपासनी यांनी तर आभार प्रदर्शन भिमराव जाधव यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!