स्पर्धा परिक्षेस मुव्हमेंट बनविणारे विद्यार्थी केंद्रीत शिक्षक डॉ.एस.ओ.माळी सर

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस.ओ.माळी हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर दिनांक ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याचा डॉ.विजय तुन्टे यांनी घेतलेला आढावा…

साधी राहणी, उच्च विचार असलेले डॉ.एस.ओ.माळी सर यांनी दि.२९ सप्टेबर १९८३ पासून प्रताप महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य सुरु केले. महाविद्यालयात ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध प्रशासकीय जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. ते एम.कॉम, एल.एल.बी असून मार्च २०२० मध्ये त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएच.डी ची पदवी संपादन केली. ज्ञानार्जन, सतत नवे अध्ययन करण्याची धडपड माळी सरांकडे होती. साधारणपणे २२ वर्षाचा प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे होता. प्रताप महाविद्यालयात उप-प्राचार्य, ज्ञान वर्धन ग्रंथालयाचे समन्वयक, शिक्षक कल्याण निधीचे उपाध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस, प्रताप महाविद्यालय क्रेडिट सोसायटीचे सचिव, करियर कौन्सिलिंग सेंटर चे समन्वयक आणि नुकतेच कैप डायरेक्टर म्हणुन सेवा दिली. यात विशेष महत्वाचे म्हणजे सी सी एम सी विभाग होय. १९९८ ते २०२० या कालखंडात त्यांनी अनेक विद्यार्थी, अधिकारी घडविले. प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत या करिता त्यांच्या सोबत अगदी सुरूवाती पासुन असणाऱ्यांची एक टीम निर्माण केली. त्यात डॉ.वाय.बी.पाटील, डॉ.निसार पटेल, डॉ.शुभांगी पवार, प्रा.एस.बी.सोनार, प्रा.आर.पी.बडगुजर, प्रा.व्ही.सी.घरटे, डॉ.जयेश गुजराथी यांच्या समवेत डॉ.विजय तुन्टे, डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.कुबेर कुमावत, डॉ.भरतसिंग पाटील, डॉ.डी.आर.चौधरी आदिंनी परिश्रम घेतले.

वाणिज्य विभाग व सी सी एम सी विभाग या दोघांना डॉ.माळी सरांनी सम न्याय दिला. विद्यापीठ निर्देशानुसार सामान्य ज्ञान पेपर हे एस वाय वर्गास अनिवार्य केल्याने सी सी एम सी विभागा चे कार्य खुप वाढले होते. रोज सायं. ४ ते ६ दरम्यान विद्यार्थ्यांना जी.के.पेपरचे नियमित अध्यापन होत असे. ज्येेष्ठ व तरूण प्राध्यापक अध्ययनाचे निरंतर कार्य करीत असत. सरांच्या नेतृत्वा मध्ये अनेक स्पर्धा परिक्षा शिबिरे, मार्गदर्शन वर्ग, कार्यशाळा आयोजित होत असत. विशेष म्हणजे ५ सप्टेबर २०१४ पासून पुज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेचे प्रथम समन्वयक डॉ.विजय तुन्टे होते. त्या नंतर डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ. चौधरी, डॉ.मांटे, डॉ.बालसकर आदिंनी कार्य संपन्न केले. सरांच्या कुशल नेतृत्वानेच हे सर्व शक्य झाले. चांगले विद्यार्थी कसे घडतील ? या संबंधी आनखिन काय करता येईल ? या करिता सर चिंतन व कृती करीत असत. अनेक विद्यार्थी हे स्पर्धात्मक वाटचाल करावेत या करिता ते प्रयत्नशील असत. त्यांनी स्पर्धा परिक्षेस मुव्हमेंट बनविले म्हणुच असंख्य विद्यार्थी हे अध्ययन कक्षात बसतात. त्यांनी प्रताप महाविद्यालयाची परंपरा समृद्ध केली. विद्यार्थ्यांचे बौद्धिक पोषण केले. साधी राहणी, वैचारिक बैठक व दृष्ठी पक्की व स्वच्छ होती. अभ्यास व निरिक्षण क्षमता प्रगत आहे. ते पुर्ण समयी कामात समाधानी राहत असत म्हणुनच ते विद्यार्थी केंद्रीत शिक्षक झाले. महाविद्यालया पुरतेच मर्यादीत न राहता ते सांस्कृतिक क्षेत्राशी सुद्धा संबंधित होते. सामाजिक उतरदायित्व पार पाडणारे होते आणि आजही आहेत. विद्यार्थी हित पाहणारे असल्याने त्यांनी डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.विजय तुन्टे, दिलिप शिरसाठ यांच्या समवेत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी,१४ एप्रिल, ५ सप्टेबर जे रोजी वस्तुनिष्ठ सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यावर कटाक्ष असायचा. बौद्धिक व आर्थिक सहकार्याने असंख्य विद्यार्थी आज उच्च पदस्थ आहेत याचे समाधान सराना आहे म्हणुनच ते विद्यार्थी घडविणारे प्राध्यापक होते असे म्हणता येईल. सरांना सेवा निवृत्ती नंतरचेेे उर्वरित आयुष्य हे निरोगी व समाधानाचे जावो हीच प्रार्थना !!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!