अमळनेर : तालुक्यातील कापूस खरेदी बुधवार पासून पारोळा येथे
सुरु होणार असल्याची माहिती मा.आ.स्मिता वाघ, आ.अनिल भाईदास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिति सभापती प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.
सीसीआय मार्फत अमळनेर तालुक्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र म्हणून निर्धारित करण्यात आलेले लामा जिनींग येथे कापूस खरेदी सुरु झालेली होती. तथापि जिनींगला नुकतीच आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याने या केंद्रावरील कापूस खरेदी बंद करण्यात आली. यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. ह्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मा.आ.स्मिता वाघ, आ.अनिल भाईदास पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक व कापूस फेडरेशन चे अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली. त्यानुसार कृषी उपन्न बाजार समिति अमळनेर येथे नोंदणी केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी नोंदणीनुसार पारोळा येथील केंद्रावर करण्यात येणार आहे. अमळनेर येथील कापूस खरेदी केंद्रावर पुढील व्यवस्था लवकरच करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे मा. आ.स्मिता वाघ, आ.अनिल भाईदास पाटील, बाजार समिति सभापती प्रफुल्ल पवार व संचालक यांनी केले आहे.