महा.एन.जी.ओ.फेडरेशन, पुणे मार्फत अमळनेर तालुक्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले मागण्यांचे निवेदन

अमळनेर : आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत अमळनेर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र ची कामे सुरु करणे व तालुक्यात स्थलांतरीत,स्थानिक गरजू गरीब रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना, मजुरांना धान्य मिळणे बाबत महा.एन.जी.ओ.फेडरेशन, पुणे मार्फत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले. कोव्हीड-१९ या जागतीक महामारीमुळे २२ मार्च २०२० पासुन संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा भारत सरकारने केली आहे. या बिकट परिस्थितीमध्ये स्थानिक व स्थलांतरीत गरजु, गरीब कुटुंबांना, मजुरांना रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत नियमित बजेटपेक्षा ४० हजार कोटींची जास्तीची तरतुदीची घोषणा केलेली आहे. यासाठी महाराष्ट्र स्तरावर १५०० सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे संघटन महा एनजीओ फेडरेशन यांनी एकत्र येऊन स्वयंसेवी पध्दतीने स्थानिक, स्थलांतरीत मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार मिळवून देण्याचे जनजागृतीचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे ठरविले आहे.

अमळनेर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची पूर्व पावसाळी व पावसाळी कामे त्वरीत सुरु करावीत यासाठी आपल्या स्तरावरुन पंचायत समिती द्वारे ग्रामपंचायत, वन विभाग, सामाजीक वनीकरण, सार्वजनीक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, सिंचन विभाग, लघु पाटबंधारे विभाग यांना आदेश निर्गमीत करावे व त्वरीत मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावेत. तसेच या परिस्थितीमध्ये स्थानिक व स्थलांतरीत गरजू गरीब कुटुंबाना, मजुरांना उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी नागपुर, मुंबई खंडपीठाच्या आदेशानुसार व १९ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार स्थलांतरीत, स्थानिक गरजू गरीब रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुबांना, मजुरांना त्वरीत धान्य वितरीत करावे. त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन आपणास निवेदन देत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेेळी महा एनजीओ फेडरेशन, पुणे अंतर्गत नरेंद्र बाळु पाटील – जिल्हा समन्वयक, महा एनजीओ.फेडरेशन, अध्यक्ष साने गुरुजी फाऊंडेशन, खान्देश विकास प्रतिष्ठान, अमळनेर, प्रा.अशोक पवार – अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर, भारती पाटील – आधार बहुउद्देशीय संस्था,अमळनेर, हिरालाल पाटील – स्व.महेशभाऊ बहुउद्देशीय संस्था,अमळनेर, सुनिल पाटील – राजरथ फाऊंडेशन, अमळनेर, कुलदीप कदम – सुहिरा बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, रविंद्र मोरे – ज्ञाानवर्धिनी फाऊंडेशन,अमळनेर, जयेश काटे – शिवशाही फाऊंडेशन,अमळनेर, जगदीश बोरसे – पेडकाई देवी बहुउद्देशीय संस्था, अमळनेर, संजीव पाटील – मटाई देवी फाऊंडेशन, अमळनेर, चेतन जाधव – ओमसाई शैक्षणिक संस्था,अमळनेर, नितीन नेरकर – नेहरु युवा मंडळ, गडखांब, ता.अमळनेर, अश्विन पाटील – उडान संस्था, अमळनेर, सतिश पाटील – जयभवानी माता बहुउद्देशिय फाऊंडेशन, कोळपिंप्री, ता.पारोळा, भटेश्वर वाणी – कै.शंकर यादवशेठ वाणी फाउंडेशन अमळनेर चे प्रतिनिधी, जयश्री साळुंखे यांनी निवेदन दिले. निवेदनावर सर्वांच्या सह्या आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!