जळगाव : येथील जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी झाली असूून त्यांचे जागी आय.ए.एस. अधिकारी असलेले अभिजीत राऊत यांची जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सांगली जिल्हा परिषदेत सीईओ पदी कार्यरत होते.
जळगाव जिल्हाभरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ होत असून रुग्णांना मिळणारी सेवा याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेविषयी जनतेच्या तक्रारी ही वाढू लागल्या होत्या. याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात कोरोना रूग्ण असलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह आठ दिवस मृत स्थितीत शौचालयात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन रुग्णालयातील दोषींवर कार्यवाही करण्यात आली. कोरोना ला आळा घालण्यात जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे देखील अपयशी ठरल्याने त्यांची उचल बांगडी झाल्याचे समजते. त्यांचे जागी आय.ए.एस. अधिकारी असलेले अभिजित राऊत यांची जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.