वासरे येथील पंधरा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर : तालुक्यातील वासरे येथील चंदन विजय पाटील नामक पंधरा वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सदर घटना घडली तेव्हा मुलाचे आई वडील शेतात गेले होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घराजवळ राहणारे दिपक पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आली असता त्यांनी तत्काळ पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर मयत हा कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता. पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी खबर दिल्यावरून मारवड पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहेत. आत्महत्येेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!