अमळनेर : शहर व तालुक्यातील कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन काळात सर्वत्र त्याचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर येथील युवा कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांचे १०० यूनिट पर्यंत वीज बील माफ करावे अशा मागणीचे निवेदन नुकतेच तहसीलदार मिलींद वाघ यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहर व तालुक्यात कोरोना चे भयंकर संकट आहे. त्या परिस्थिती मध्ये शहरातील सर्व व्यावसायिकांना बसला असुन त्यामुळे शासनाने लोकांचा हिताचा विचार करुन निर्णय घ्यावा. कोरोना या विषाणूने देशावर मोठे संकट आल्यानंतर देशात सर्वत्र लॉकडाऊन झाले. सर्वत्र त्याचा फटका बसला. त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारीचे संकट ओढवले. त्यात मंदी आली सर्व उद्योगधंदे बंद पडलीत. अत्यावश्यक सेवेत फक्त किराणा, भाजीपाला, दुध, दवाखाने, मेडिकल्स् वगळता संपुर्ण व्यवहार बंद झाले. त्यामुळे काम मिळेनासे झाले. यामध्ये सलुन, ब्यूटी पार्लर व ऑटो रिक्षा, खाजगी वाहने, वाजंत्री, सराफ ज्वेलर्स, हॉटेल, किरकोळ विक्रेते यांचे जीवनच उध्वस्त झाले यातून सावरायला वेळ लागेल. लॉकडाऊनचा फटका बसल्याने हाती पैसाही नाही. शेतकरी, शेतमजुर, व्यापारी यांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. शेतकऱ्यांनी माल जसा वेळ मिळेल तसा विकला. त्यासाठी शहरातील नागरिक व शेतकरी कामगार वर्ग यांना सरकारने दिलासा द्यावा व या काळातील सर्व नागरिकांचे १०० यूनिट पर्यंत विज बिल माफ करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मिलींद वाघ यांच्याकडे दिले. यावेळी गोविंदा बावीस्कर,भुषण भदाणे, सुनिल शिंपी, सनी गायकवाड, गणेश पाटील उपस्थित होते.