धुळे : जिल्ह्यातील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस. एस. व्ही. पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांचा ता.२२ रोजी दुपारी तीन च्या सुमारास बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील एस. एस. व्ही. पी. एस. इंजिनिअरींग काॅलेजचे सहा विद्यार्थी हे लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेले असता, पैकी शुभम प्रेमराज पाटील (पळासदडे, अमळनेर), रोहित गिरासे (धुळे ), शुभम अनिल चव्हाण (धुळे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यात वाचलेल्या तीन जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.