कोरोना थांबेना ! जिल्ह्यात पुन्हा १०६ कोरोनाबाधीत आढळले

अमळनेर तालुक्यात आज चार बाधित रुग्ण; ५७ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत

अमळनेर : जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून आज मंगळवारी पुन्हा जिल्ह्यात १०६ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधीतांची संख्या २५८९ इतकी झाली आहे. आजच्या बाधीत रुग्णांंत.. जळगाव शहर ३७, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ४, अमळनेर ४, चोपडा ४, पाचोरा १, धरणगाव ३, यावल ८, एरंडोल १५, जामनेर ३, रावेर ५, पारोळा १७, अन्य जिल्हा २ याप्रमाणे वाढ आहे.

अमळनेर तालुक्यात आज चार बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकूण ४६ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. बाधित रुग्ण शहरातील शिव कॉलनी भागातील ८२ वर्षीय पुरुष व २९ वर्षीय महिला,  शिरुड येथील एक ६६ वर्षीय पुरुष, सप्तशृंगी कॉलनीतील ९२ वर्षीय पुरुष असल्याचे समजते. आतापर्यंत ५७ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. शहरात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत असल्याने नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!