आमदार अनिल पाटील व जि.प.सदस्य सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अमळनेर : येथील लायन्स क्लब तर्फे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या सर्व आजारी व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती लायन्स क्लब अमळनेर ला लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयास वॉटर कुलर व वॉटर फिल्टर भेट देत सामाजिक दायित्व निभावले. सदरच्या वॉटर कुलर व फिल्टर बसवण्यासाठी क्लबला आलेला सर्व खर्च लायन्स क्लबचे सदस्य सुनील लूनावत, एम.एस.जैन ग्रुप तर्फे करण्यात आला आहे. सदरचे वॉटर कुलर व फिल्टर चे उद्घाटन आज अमळनेर शहराचे आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अनिल पाटील यांचा सत्कार लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य डॉ.युसुफ पटेल यांच्या हस्ते तर सौ.जयश्री पाटील यांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर लायन्स सदस्य सुनील लुनावत व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.प्रकाश ताडे यांचा सत्कार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.प्रकाश ताडे, डॉ.संदीप जोशी तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी बजरंग अग्रवाल, डॉ. युसुफ पटेल, येझदी भरूचा, योगेश मुंदडा, जितेंद्र जैन, पंकज मुंदडा, मिलिंद नवसारीकर, रवींद्र जैन, अनिल रायसोनी, सुशील पारेख, महेंद्र पाटील, महावीर पहाडे, चेतन जैन, प्रसन्ना पारेख, अजय हिंदुजा व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कोरोना योद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब तर्फे ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स सेक्रेटरी प्रसन्ना पारेख यांनी केले.