सचिन चे दीर्घ आजाराने निधन

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी गुलाबराव जिजाबराव पाटील यांचा मुलगा सचिनचे आज पहाटे ४.३० वाजता दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी तो १७ वर्षांचा होता. जन्मापासूनच तो दिव्यांग असल्याने खेळण्याच्या वयातही तो फारसा घराबाहेर पडू शकला नाही. वडील स्व:मालकीचे वाहन चालवतात. गेल्या सतरा वर्षात त्याच्या कुटुंबीयांनी त्याची नित्य सेवा केली. नियतीलाही ते मान्य नव्हते. त्याच्या पश्चात आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तो प्रगतीशील शेतकरी जिजाबराव साहेबराव पाटील यांचा नातू होता. दिव्यचक्र परिवारातर्फे सचिनला भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!