
शहादा : येथील नगरपालिका संचलित पूज्य सानेगुरुजी वाचनालय येथे नुकताच “वाचन प्रेरणा दिवस” साजरा करण्यात आला. वाचनालयाचे सर्वात जुने सभासद सुरेश विद्याधर पाठक यांचे हस्ते छोटेखानी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब देशमुख, सुरेश पाठक, सागर साळुंखे, वाचक व विद्यार्थी उपस्थित होते.
भाऊसाहेब यांची दोन महिन्यांपूर्वी शहादा नगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांचे पुस्तकप्रेम ते विसरले नाहीत. त्यांनी शहादा येथील सानेगुरुजी वाचनालयास भेट देत आपली वाचनाची आवड जोपासत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी वाचनालयास पूज्य साने गुरुजी लिखित दुर्मिळ असे “श्री.संत सखाराम महाराज चरित्र” हे पुस्तक भेट दिले.