
अमळनेर : शहरातील मुख्य चौक असलेल्या पन्नालाल चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृती स्मारक उभे करावे अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा सह विविध सामाजिक संघटनांनी नुकतीच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड व उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड यांना निवेेेदनाद्वारे केली आहे. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा चे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, विजय गाढे, भिमराव महाजन, मिलिंद निकम, प्रा.जितेंद्र संदानशिव यांचेसह शाहू, फुले, आंबेडकरी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील विविध चौकात अनेक महापुरुषांची स्मारकं तयार करण्यात आलेली आहेत. यात महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचे स्मारक नसल्याने नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी महात्मा ज्योतिबा फ़ुले स्मारकाच्या विषयाकडे दुर्लक्ष न करता प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे. निवेदनावर रणजित शिंदे, कमलाकर संदानशिव, अजय भामरे, मिलींद निकम, गौतम बिऱ्हाडे, विजय खैरनार, भिमराव महाजन, विजय गाढे, ए.एम.मोरे, राजरत्न रामराजे, जितेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, अरविंद बिऱ्हाडे, समाधान बिऱ्हाडे, गौरव सोनवणे, अजय बिऱ्हाडे, अक्षय सोनवणे, सतिश सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यापूर्वीच महाराष्ट्र माळी महासंघ, कांच माळी समाज पंच मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, संत सावता माळी सेवा मंडळ, संत सावता माळी मित्र मंडळ, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ, नगरसेविका रत्नमाला साखरलाल माळी, नगरसेवक भाऊसाहेब महाजन आदींसह अनेक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही फुले दाम्पत्याच्या स्मारकाची मागणी केलेली आहे. लवकरच नगरपालिका सत्ताधारी गटाचे नेतृत्व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवक यांनाही बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसह भेट घेवून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृती स्मारकाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे.
